Rohit Pawar | ‘महाराष्ट्र धर्म‘ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत‘ करताय; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचा अनाजी पंत म्हणून उल्लेख केला होता.

त्यानंतर आज युवा संघर्ष यात्रेदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

‘महाराष्ट्र धर्म’ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहे, असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी ( Rohit Pawar ) आधुनिक ‘अनाजी पंत’ देवेंद्र फडणवीस यांना म्हटलं असल्याच्या चर्चा सुरू आहे.

ट्विट करत रोहित पवार ( Rohit Pawar )  म्हणाले, “#युवा_संघर्ष यात्रेत साडे चारशे किमी पायी चालल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे पूर्वीच्या काळात मराठेशाही एका ‘अनाजी पंत’ ने संपवली आताच्या काळामध्ये ‘महाराष्ट्र-धर्म’ संपवण्याचे काम एक आधुनिक ‘अनाजी पंत’ करत आहेत. #अनाजी_पंत”

Opponent referred Devendra Fadnavis as Anaji Pant

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर अनाजी पंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना बंदी बनवण्यासाठी घाट घातला असल्याचं इतिहासात नमूद केलेलं आहे.

त्यामुळं सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून विरोधी पक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनाजी पंत म्हणून उल्लेख करतात.

गेल्या काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांचा या शब्दात उल्लेख केला होता. तर आज रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अनाजी पंत म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या