Sanjay Raut | शेतकऱ्यांशी भावनिक नातं नसलेलं सरकार सत्तेत – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. पावसासह राज्यात बहुतांश ठिकाणी गारपीट झाली आहे.

यानंतर राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) तेलंगणा दौऱ्यावर आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी सत्ताधारी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. शेतकऱ्यांशी भावनिक नातं नसलेलं सरकार सत्तेत आहे, असं संजय राऊत  ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय राऊत  ( Sanjay Raut ) म्हणाले, “राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून गारपीट आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण इत्यादी भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. शेतकरी आक्रोश करत आहेत.

अशावेळी राज्यातील प्रमुखांनी राज्यात उपस्थित राहायला हवं. मात्र, ते तेलंगणात जाऊन प्रचारामध्ये गुंतले आहे. त्यांना तिकडे खोके वगैरे पाठवायचे असेल तर ते पाठवू शकतात.

परंतु, त्यांनी राज्यात थांबायला हवं. आज खोक्यांची आणि मदतीची गरज शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे तुम्ही तेलंगणामध्ये काय करत आहात? तिकडे तुम्हाला कोण विचारत आहे? अत्यंत दुर्दैवी आहे.”

BJP will lose in Telangana – Sanjay Raut

पुढे बोलताना ते  ( Sanjay Raut ) म्हणाले, “शेतकऱ्यांशी भावनिक नातं नसलेलं सरकार सत्तेत आहे. बेकायदेशीरपणे हे सरकार सत्तेत आहे.

त्यांच्याशिवाय तेलंगणाच्या निवडणुका होणार नाही का? ते तिकडे गेले नाही तरी निवडणुका होतील. ते तिकडे गेले काय आणि नाही गेले काय? भारतीय जनता पक्ष तेलंगणामध्ये हरणार आहे.

तुम्ही घटनाबाह्य बेकायदेशीर राज्यकर्ते आहात, तरी निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चालले आहेत. एक हिंदुहृदयसम्राट आहे, तर दुसरे उपहिंदुहृदयसम्राट.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.