PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी मिळणार? पाहा अपडेट

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री निधी सन्मान योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत ( PM Kisan Yojana ) शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांपर्यंत हे पैसे पोहोचवले जातात.

आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेतील ( PM Kisan Yojana ) 15 हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी सरकारने या योजनेतील पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला आहे.

देशातील आठ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेतील पंधराव्या ( PM Kisan Yojana ) हप्त्याचा लाभ मिळाला आहे. अशात  शेतकरी आता या योजनेतील सोळाव्या हप्त्याची वाट बघत आहे.

16th installment likely to be available between February and March

प्रधानमंत्री सन्मान योजनेचे ( PM Kisan Yojana )15 हप्ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. यानंतर शेतकरी आता या योजनेतील 16 व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे.

शेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या योजनेतील ( PM Kisan Yojana ) सोळावा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या योजनेतील ( PM Kisan Yojana ) सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जमिनीची कागदपत्रांची पडताळणी, ई-केवायसी आणि आधार कार्ड लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या या सर्व गोष्टी पूर्ण असतील तरच तुम्हाला या योजनेच्या ( PM Kisan Yojana ) सोळाव्या हप्त्याचा लाभ मिळेल.

दरम्यान, 155661, 1800115526 किंवा 01123381092 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही या योजनेशी ( PM Kisan Yojana ) संबंधित अधिक माहिती मिळू शकतात.

त्याचबरोबर तुम्हाला जर या योजनेमध्ये ( PM Kisan Yojana ) कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर तुम्ही तुमची समस्या pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर नोंदवू शकतात.

महत्वाच्या बातम्या