PM Kisan Yojana | सरकारची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6000 ऐवजी 12000 रुपये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेला नमो शेतकरी महासन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

Farmers will get 12000 rupees instead of 6000 per year

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) 6000 रुपये मिळतात. या 6000 रुपयांव्यतिरिक्त शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 6000 रुपये मिळतील. अशाप्रकारे शेतकरी वर्षाला 12000 रुपये मिळू शकतात.

दरम्यान, केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Nidhi Sanman Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी 6000 रुपये हस्तांतरित केले जातात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पाठवले जातात. गेल्या अनेक वर्षांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे.

प्रधानमंत्री निधी सन्मान योजनेचे (PM Kisan Yojana) 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. शेतकरी आता या योजनेतील 14 व्या हप्त्याची वाट बघत आहे. या योजनेतील चौदाव्या हप्त्याबाबत सरकारकडून सतत अपडेट दिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या