🕒 1 min read
Rupali Patil Thombare | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले असून 2 जुलै रोजी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar has joined the ruling party as an friend – Rupali Patil Thombare
रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, “राष्ट्रवादीनं याआधी देखील भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आहे. विरोधक म्हणून काम करत असताना संविधात्मक पद्धतीनं अजित पवार सत्ताधाऱ्यांसोबत मित्रपक्ष म्हणून सामील झाले आहे.”
पुढे बोलताना त्या (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, “सध्या सगळे म्हणतात राजकारणाचा चिखल झाला आहे. त्यामुळे हा चिखल साफ करण्यासाठी कुणाला तरी त्यामध्ये उतरावं लागणार आहे. सध्या अजित पवार लोकांना विलन वाटत असतील तरी येणाऱ्या काळात ते हिरो असणार आहे.”
“अजित पवार यांच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट व्हायचं आहे ते अजित पवार यांच्या सोबतच होणार आहे. सध्या जे घडत आहे त्याबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवारांना आहे”, असं मत देखील रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी व्यक्त केलं होतं.
महत्वाच्या बातम्या
- Rupali Chakankar | “आम्ही त्यांची विचारधारा स्वीकारली…”; रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य
- Ajit Pawar VS Eknath Shinde | महाराष्ट्र देशाच्या बातमीवर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेना डच्चू तर अजित पवार घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
- Asim Sarode | देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील राजकारण नसावलं – असीम सरोदे
- Eknath Shinde | राजकीय वर्तुळात पुन्हा होणार मोठा भूकंप? CM शिंदे तातडीनं नागपूरहुन मुंबईला रवाना
- Nilesh Rane | “… म्हणून कोल्हा तो कोल्हाचं राहणार” निलेश राणेंची अमोल कोल्हेंवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











