Nilesh Rane | “… म्हणून कोल्हा तो कोल्हाचं राहणार” निलेश राणेंची अमोल कोल्हेंवर बोचरी टीका

Nilesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या शपथविधीला अमोल कोल्हे (Amol Kolhe) देखील उपस्थित होते. मात्र, त्यानंतर त्यांनी मी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असल्याचं स्पष्ट करत खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी अमोल कोल्हेंवर बोचरी टीका केली आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी लिखित स्वरूपात शरद पवारांना राजीनामा देणार असल्याचं कळवलं होतं. यावरून निलेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना धारेवर धरलं आहे. राजीनामा पक्ष अध्यक्षांकडे नाही तर लोकसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Nilesh Rane’s tweet regarding Amol Kolhe’s resignation

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या राजीनाम्याबाबत ट्विट करत निलेश राणे म्हणाले,”राजीनामा पक्ष अध्यक्षांकडे नाही तर लोकसभा अध्यक्षांकडे द्यायचा असतो. पण कोल्हा तो कोल्हाचं राहाणार.” निलेश राणे यांच्या या वक्तव्यावर अमोल कोल्हे काय प्रतिक्रिया देतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शरद पवार यांच्यासोबत राजीनाम्याबाबत चर्चा केली आहे. त्यानंतर अमोल कोल्हे ट्विट करत म्हणाले, “सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीबाबत मनातील अस्वस्थता आदरणीय शरद पवार साहेबांना भेटून मांडली.

“अमोल, ही अस्वस्थता फक्त तुझ्याच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक युवक व मतदाराच्या मनात आहे. आता आपल्याला लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढावा लागेल. शिरूरच्या मायबाप जनतेने 5 वर्षांसाठी दिलेल्या जबाबदारीचे 8-10 महिने अजून बाकी आहेत. या कार्यकाळात अनेक कामे मार्गी लागली असून अनेक महत्वकांक्षी प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. हे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे सुद्धा तुझं कर्तव्य आहे.” असं मोलाचं मार्गदर्शन आदरणीय साहेबांनी केलं .

एकंदर पवार साहेबांना आज भेटून माझ्या मनातील अनेक प्रश्नांना सकारात्मक उत्तरं मला मिळाली आहेत.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.