Rupali Patil Thombare | शिवाजी महाराज जसा तह करायचे, तसाच तह अजित पवारांनी केला; रूपाली पाटील ठोंबरेंचं खळबळजनक वक्तव्य

Rupali Patil Thombare | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या घटनेवर रूपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराज जसा तह करायचे तसाच तह अजित पवार यांनी केला असल्याचं रूपाली पाटील  ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar has joined the Shinde-Fadnavis government as friend – Rupali Patil Thombare

रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, “अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीला बंड म्हणणं चुकीचं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवार मित्र पक्ष म्हणून सामील झाले आहेत. गुवाहाटी किंवा कुठेही पळून न जाता अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार मित्र पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकण्यासाठी ज्या प्रकारे तह करायचे, तसाच अजित पवारांनी हा तह केला आहे.”

पुढे बोलताना त्या (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला अजित पवार यांनी आणलं आहे. त्यामुळे आयुष्यात जे काय चांगलं वाईट व्हायचं आहे, ते अजित पवार यांच्यासोबत होणार आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शरद पवारांना आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये आम्ही बोलणं योग्य नाही.”

“शिंदे-फडणवीस यांना लक्षात आलं असेल की अजित पवार सरकार चालवण्यासाठी सक्षम आहेत. कदाचित त्याच्यामुळं हे सरकार बनलं असेल. आमच्यासारख्या नेत्यांना सांगून सरकार स्थापन होत नाही. आमच्यासारख्या नेत्याचा एकच अजेंडा आहे. तो म्हणजे आमच्या भागातील आमच्या महाराष्ट्रातील लोकांचं काम करणं”, असही त्या (Rupali Patil Thombare) यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.