Sudhir Mungantiwar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
Nationalist Congress party has no MLA – Sudhir Mungantiwar
माध्यमांशी बोलत असताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “ही काय पोखरानची गुप्त चाचणी आहे का? जर तुमच्यासोबत (शरद पवार) आमदार असतील तर पत्रकार परिषद घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आमदार नाही. राष्ट्रवादीकडे आमदार असते तर त्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन सर्वांना उपस्थित केलं असतं. मात्र, आज त्यांच्याकडे आमदार नाही.
पुढे बोलताना ते (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था शोले चित्रपटासारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर, हम अकेले. राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांना माननीय मोदी साहेबांच्या (Narendra Modi) नेतृत्वाखाली काम करायची इच्छा होती.”
“राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारताची बदनामी करत आहे. आपल्या कुटुंबात एखाद्या सदस्यात काही कमी असेल तर आपण ते गावभर जाऊन सांगत नाही. मात्र, राहुल गांधी अमेरिकेत जाऊन देशाची बदनामी करत आहे. अशा नेत्याला देशाचं प्रधानमंत्री करायचं? हे अशक्य आहे”, असही ते (Sudhir Mungantiwar) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | शिंदे गटाला मोठा दणका! अजित पवार गटाला मिळणार ‘हे’ महत्त्वाचे खाते
- Vijay Wadettiwar | भाजपचा DNA हा ओबीसी विरोधी – विजय वडेट्टीवार
- Praful Patel | “तेव्हा 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली पण शरद पवारांनी…”; प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देणार! सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल
- Sanjay Raut | नेत्यांनी नेत्यांच्या हिताकरिता नेत्यांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही – संजय राऊत