Vijay Wadettiwar | भाजपचा DNA हा ओबीसी विरोधी – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संपूर्ण राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधण्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोडाफोडी करून सत्ता टिकवण्यात मग्न असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संपूर्ण राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधण्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फोडाफोडी करून सत्ता टिकवण्यात मग्न असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “भाजपाचा ‘डीएनए’ हा ओबीसी विरोधी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात संपूर्ण राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करण्याची घोषणा केली होती ती अजून प्रत्यक्षात उतरली नाही.”

When will CM and Deputy CM pay attention to the questions of OBC students? – Vijay Wadettiwar

“दहावी बारावीचे निकाल लागून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला आले तरीही सरकारचे याकडे लक्ष नाही. फोडाफोडी करून सत्ता टिकवण्यात मग्न असलेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ओबीसीं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे कधी लक्ष देतील ?”, असही त्यांनी (Vijay Wadettiwar) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून (Vijay Wadettiwar) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार फोडाफोडीचं  राजकारण करत असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही