Sanjay Raut | भाजप राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपला महाराष्ट्रातून शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार ही नावं नष्ट करायची आहे, असं संजय राऊत म्हणाले आहे. BJP has broken NCP like Shivsena – … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. भाजपला महाराष्ट्रातून शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार ही नावं नष्ट करायची आहे, असं संजय राऊत म्हणाले आहे.

BJP has broken NCP like Shivsena – Sanjay Raut 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “भाजपनं शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीला फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांना पकडून राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर भाजपनं दावा करायला लावला आहे. भाजप हे राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट आहे. पक्ष एका विशिष्ट आकड्यात फोडायचा आणि त्या पक्षाला दावा करायला लावायचा.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव नष्ट करायचं. त्यांचा इतिहास नष्ट करायचं काम भाजप करत आहे. भाजप स्वतः काही करत नाही. जे स्वतः काही करत नाही ते दुसऱ्याचा इतिहास नष्ट करतात. महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील त्यांनी हे प्रयत्न केले आहे.”

“भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी ते महाराष्ट्रातून बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, शरद पवार यांचा इतिहास नष्ट करू शकत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे, भाजपच्या इज्जतीचं आणि प्रतिष्ठेचं महाराष्ट्रात नव्हे तर देशात वस्त्रहरण झालं आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही