🕒 1 min read
Eknath Shinde | ठाणे: सध्या राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 40 आमदार बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यांच्या या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अशात आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्यांनं शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Shishir Shinde will join Shinde group
माजी आमदार शिशिर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिशिर शिंदे यांच्यासोबतच ठाकरे गटाचे नेते विलास पारकर देखील शिंदे गटात सामील होणार आहेत.
शिवसेना शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राजकीय नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अक्षया देवधर, माधव देवचाके, आदिती सारंगधर, हार्दिक जोशी इत्यादी कलाकार आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
दरम्यान, अजित पवार 40 आमदारांसह भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर 9 मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या 9 मंत्र्यांच्या विरोधात जयंत पाटील यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | ‘हा’ नेता होणार अजित पवार यांच्या गटाचा प्रदेशाध्यक्ष
- Amol Kolhe | “… पण बापला नाही विसरायचं”; अमोल कोल्हेंची अजित पवारांवर बोचारी टीका
- Raj Thackeray | “उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरी…”; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
- Jitendra Awhad | अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरावा – जितेंद्र आव्हाड
- Ajit Pawar | NCP मध्ये नेमकं चाललंय काय? काल अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणारे ‘ते’ नेते आज शरद पवारांसोबत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











