Amol Kolhe | “… पण बापला नाही विसरायचं”; अमोल कोल्हेंची अजित पवारांवर बोचारी टीका

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: काल (2 जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी काल उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर अजित पवारांवर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे.

I will always be with Sharad Pawar – Amol Kolhe

अजित पवारांनी बंड केल्यानंतर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) पाठिंबा दर्शवला आहे. मी कायम शरद पवारांसोबत राहणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. त्यांनी यासंबंधित सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांचा सिरीयलमधील डायलॉग आहे. यामध्ये अमोल कोल्हे म्हणतात, “जगात सगळं विसरायचं पण बापाला कधी नाही विसरायचं. त्याला भेटल्यानंतर त्याची विचारपूस केल्यानं तो ओंबरतो.” मी साहेबांसोबत, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

“जेव्हा मन आणि डोक्याचं युद्ध चालू असतं तेव्हा आपल्या मनाचं ऐका. कारण डोकं कधी-कधी नैतिकता विसरतं. मात्र, मन कधीचं  विसरत नाही”, या कॅप्शन्सह अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.