Jitendra Awhad | अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरावा – जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी शरद पवारांना ऐवजी नरेंद्र मोदींचा फोटो वापरावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहे. शरद पवार यांनी कालच सांगितलं की राष्ट्रवादी चिन्ह आणि पक्ष माझा आहे. त्यामुळे ज्यावेळी शरद पवार म्हणतात पक्ष माझा चिन्ह माझं, त्यानंतर त्यांच्या परवानगीशिवाय पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणीही वापरू शकत नाही. त्यांची परवानगी असेल तर तुम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह जरूर वापरू शकतात.

We are always with Sharad Pawar – Jitendra Awhad 

पुढे बोलताना ते म्हणाले, “अजित पवारांना जर फोटो वापरायचा असेल तर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या राष्ट्रीय नेत्याचा फोटो वापरावा. अजित पवारांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचा फोटो वापरावा. कुणी काहीही केलं तरी आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी कायम आहोत.”

दरम्यान, काल अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित असणारे काही नेते आज शरद पवार यांच्यासोबत साताऱ्यामध्ये शक्ती प्रदर्शन करताना दिसले आहे. यामध्ये शशिकांत शिंदे, अतुल बेनके आणि मकरंद पाटील या नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.