Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 आमदार घरी जाणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे. दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी, असं शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “अहंकारी राजा आणि पुत्र विलासी
दिमतीला ठेवला शापित दरबारी
अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी
अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी
संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी
काय ती रोज सुरु असायची सरबराई!
बघा काय अवकळा आली
गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला
अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला
झाला मोह “जाणत्या राजांना” याच संजयाचा
अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा
आम्ही सांगतं होतो वारंवार यांना
आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना
आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा
यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!”
अहंकारी राजा आणि पुत्र विलासी
दिमतीला ठेवला शापित दरबारी
अवतार शकुनीचा नाम मात्र "संजय" धारीअहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी
संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी
काय ती रोज सुरु असायची सरबराई!बघा काय अवकळा आली
गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला
अहंकारी राजा, विलासी पुत्र…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 3, 2023
Ajit Pawar broke the record of swearing in as Deputy Chief Minister – Sanjay Raut
दरम्यान, काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली (Ashish Shelar) आहे. त्यांच्या या शपथविधीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आत्तापर्यंत पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम मोडला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका
- Sanjay Raut | “सध्याचे मुख्यमंत्री घरी जातील अन् अजित पवार..”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांचा पोपट झाला, राज्याला मिळणार नवा मुख्यमंत्री; ठाकरे गटाची भविष्यवाणी
- Chitra Wagh | “प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड तुम्ही…”; चित्रा वाघांचा संजय राऊतांवर घणाघात
- Sanjay Shirsat | बाळासाहेब ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं – संजय शिरसाट