Sanjay Raut | गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका

Sanjay Raut | दिल्ली: काल अजित पवार (Ajit Pawar) 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली आहे. अजित पवारांनी शरद पवारांना (Sharad Pawar) गुरुपौर्णिमेच्या दिवशी दगा दिला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Fraud politics is going on in Maharashtra politics – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “कालपर्यंत शरद पवार कुणाचे तरी गुरु होते. मात्र, गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दगबाजीचं राजकारण सुरू आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची चिता जळत असताना, अजित पवारांचा शपथविधी झाला आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या संस्कृतीवर कलंक लावण्याचं काम करत आहे. त्यांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. राजकारणातून, इतिहासातून आणि समाजकारणातून बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना आणि शरद पवार यांचा नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

“अजित पवारांचं हे आयोजन, प्रयोजन, नियोजन फक्त उपमुख्यमंत्री पदासाठी नाही. अजित पवार यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. तब्बल पाच वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. परंतु यावेळी त्यांची डील फक्त उपमुख्यमंत्री पदासाठी नाही तर मुख्यमंत्री पदासाठी आहे, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या