Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: आज राज्यात एक दुखद घटना घडली आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसचा समृद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
या अपघातामध्ये तेजस नावाच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेजस मूळचा वर्ध्याचा रहिवासी होता. सोमवारपासून तो पुण्यातील एका कंपनीत रुजू होणार होता. मात्र, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.
Very insensitive government – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत संजय राऊत म्हणाले, “अत्यंत असंवेदनशील सरकार. देवेंद्रजी एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.”
अत्यंत असंवेदनशील सरकार.
देवेंद्र जी एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना?
राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @AUThackeray https://t.co/OLHIkCglxd— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2023
दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. हा समृद्धी महामार्ग आहे की मृत्यूचा महामार्ग? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळं भाजप आणि महायुतीचं ‘आक्रोश आंदोलन’ रद्द
- Jitendra Awhad | हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला खडा सवाल
- Keshav Upadhye | संजय राऊतांनी बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची – केशव उपाध्ये
- Imtiaz Jaleel | समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर प्रवाशांची हत्या झाली – इम्तियाज जलील
- Raj Thackeray | “समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असताना आपण मोर्चाच्या राजकारणात रमणार आहोत की…”; मनसेची ठाकरे गटावर टीका