Keshav Upadhye | संजय राऊतांनी बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: आज समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं होतं. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray,) यांचं नाव असलेल्या महामार्गाला शापित म्हणताना संजय राऊत यांनी जनाची नाही तर किमान मनाची ठेवायला हवी होती, असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Keshav Upadhye tweeted on Sanjay Raut’s statement

ट्विट करत केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले, “वंदनीय बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची होती. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ हा कार्यक्रम राबवला आहे. समृद्धी महामार्गावर झालेला अपघात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा केवळ अपघात आहे, याचं कारण अजून समोर यायचं आहे. त्यामुळे वास्तविक, ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही.”

“पण, संजय राऊत यांना सत्ताधाऱ्यांची कावीळ झाली असल्याने प्रत्येक गोष्ट पिवळी दिसत आहे. महामार्ग हे विकासाचे महत्वाचे साधन असते. यावर होणारे अपघात हे टळलेच पाहिजेत, या मताचे आम्हीही आहोत. पण अपघातावरून राजकारण करणाऱ्या राऊतांचा प्रयत्न म्हणजे मृतांच्या टाळुवरील लोणी खाण्यासारखाच आहे”, असही ते (Keshav Upadhye) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचारातून निर्माण झालेला रस्ता आहे. हा रस्ता बनवण्यासाठी सरकारनं मनमानी केली होती. अनेकांच्या जमिनी बळकावून हा रस्ता बनवण्यात आला आहे. या महामार्गाला अनेकांचे शाप लागले आहे. म्हणून हे अपघात घडत आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.