Raj Thackeray | “समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असताना आपण मोर्चाच्या राजकारणात रमणार आहोत की…”; मनसेची ठाकरे गटावर टीका

Raj Thackeray | मुंबई: समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 हून अधिक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एकीकडे हा अपघात झाला असताना दुसरीकडे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईमध्ये आज राज्य सरकारविरुद्ध ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे गटाच्या मोर्चावर प्रतिक्रिया (Raj Thackeray) दिली आहे. ट्विट करत संदीप देशपांडे म्हणाले, “आज बुलढाण्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली असताना आपण मोर्च्याच्या राजकारणात रमणार आहोत की आपल्यामध्ये काही संवेदना अजून जागृत आहे ??आपणच विचार केला पाहिजे.”

Under the leadership of Aditya Thackeray, the Thackeray group will take out a march

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट आज मुंबई महानगरपालिकेकडे मोर्चा (Raj Thackeray) काढणार आहे. ऊन असो वा पाऊस मोर्चा निघणारच, असं म्हणत ठाकरे गट मोर्चा काढत आहे. मुंबईमध्ये विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवरून हा मोर्चा काढण्यात येत आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या या मोर्चाला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय प्रत्युत्तर देणार आहे. ‘चोर मचाये शोर’ असे नरे देत सत्ताधारी पक्षाकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यांचा हा मोर्चा (Raj Thackeray) दुपारी 04 वाजता नरिमन पॉईंट येथे सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या