Samruddhi Mahamarg । बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! बस पेटली अन् 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

बुलढाणा । समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. सतत या महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. वाहनाचे टायर फुटून, जंगली जनावर आडवे येऊन तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या महामार्गावर अपघात होत असतात. सध्या देखील या महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यामध्ये (Buldhana) अत्यंत भीषण अपघात झाला … Read more

Published On: 

बुलढाणा । समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार झाल्यापासून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. सतत या महामार्गावर अपघात झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. वाहनाचे टायर फुटून, जंगली जनावर आडवे येऊन तसेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या महामार्गावर अपघात होत असतात. सध्या देखील या महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यामध्ये (Buldhana) अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Bus Accident)

Bus accident on Samruddhi Mahamarg near Sindhkhedraja Pimpalkhuta village

सिंधखेडराजा (Sindkhed Raja) येथील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) बस डिव्हायडरवर आदळली. आणि हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामुळे बस पलटी झाली आणि बसला अचानक आग लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

या अपघातामध्ये बस जाळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. या बसमधील 20 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले असून या सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही