Share

Ashish Shelar | समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळं भाजप आणि महायुतीचं ‘आक्रोश आंदोलन’ रद्द

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. ठाकरे गटाच्या या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआयकडून ‘चोर मचाये शोर’ म्हणत आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र, समृद्धी मार्गावर झालेल्या अपघातामुळे सत्ताधाऱ्यांचं हे आंदोलन रद्द करण्यात आलं आहे.

‘Akrosh Andolan’ of BJP and Mahayuti canceled

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्विट करत भाजप आणि महायुतीचं आक्रोश आंदोलन रद्द झाल्याची माहिती दिली आहे. ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, “बुलढाण्यातील अत्यंत वेदना देणाऱ्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. दु:खाचा डोंगर कोसळेल्या कुटुंबासोबत आमच्या ही सहवेदना! स्वतः मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांनी सुध्दा शोकभावना व्यक्त केल्या आहेत. तर मा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहचत आहेत.

“या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज होणारे भाजप आणि महायुतीचे “आक्रोश आंदोलन” आज न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आजचा दिवस दुःखाचा आहे, आज आम्ही काही बोलणार नाही. पण मुंबईकरांना लुटणाऱ्यांकडे हिशेब मात्र यापुढे ही मागतच राहू”, असही ते (Ashish Shelar) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, आज नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या अपघातावरून राज्यातील राजकीय (Ashish Shelar) वातावरण चांगलं तापलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट मोर्चा काढणार आहे. ठाकरे गटाच्या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now