Sanjay Raut | “सध्याचे मुख्यमंत्री घरी जातील अन् अजित पवार..”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut | दिल्ली: काल (2 जुलै) राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना धारेवर धरलं आहे. Ajit Pawar has made a record of swearing in as Deputy Chief … Read more

Published On: 

Sanjay Raut | दिल्ली: काल (2 जुलै) राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना धारेवर धरलं आहे.

Ajit Pawar has made a record of swearing in as Deputy Chief Minister – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “अजित पवारांचं हे नियोजन, आयोजन, प्रयोजन फक्त उपमुख्यमंत्री पदासाठी नाही. अजित पवार यांच्या या निर्णयाचे परिणाम राज्यातील राजकारणावर मोठ्या प्रमाणात झाले आहे. अजित पवार यांनी आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. तब्बल पाच वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, यावेळी त्यांचं डील उपमुख्यमंत्री नाही तर मुख्यमंत्री पदासाठी आहे.

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “सध्याचे मुख्यमंत्री घरी जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार 100% अपात्र ठरणार आहे. त्यांची दिल्लीतील शक्ती देखील त्यांना आता वाचवू शकत नाही. अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने ही पुढची व्यवस्था करून ठेवली आहे. अजित पवार यांना पुढचं मुख्यमंत्री पद देण्याचं काम झालं आहे.”

“विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा आहे. परंतु शिवसेनेच्या फुटीसंदर्भात जो निर्णय घेतला आहे, तोच निर्णय काल झालेल्या घटनेला लागू होतो”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही