Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: आज मुंबईमध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर त्यांनी आदित्य ठाकरेंना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं, असं संजय शिरसाट म्हणाले आहे.
This march of the Thackeray group is a drama – Sanjay Shirsat
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “ठाकरे गटाचा हा मोर्चा म्हणजे नौटंकी आहे. ठाकरे गटानं चोरी केली आहे. त्यामुळे लोकं शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आणि काय तो युवराज (आदित्य ठाकरे). आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी आदित्य ठाकरे यांना लाथ मारून घराबाहेर काढलं असतं. ते कोणत्याही माणसाला काहीही बोलत आहेत. कोणत्याही माणसाचा अपमान करत आहेत.”
पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “मला लोक आदित्य ठाकरेच्या संपत्तीबद्दल फोन करून विचारतात. आदित्य ठाकरेंकडे एवढी संपत्ती कशी आली? असे प्रश्न मला लोक विचारतात. आदित्य ठाकरे कुठे माती कामाला जातात याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यायला हवं.”
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा मोर्चा मरीन लाइन्सपासून ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत काढला जाणार आहे. मुंबईत विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा मोर्चा (Sanjay Shirsat) काढला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | देवेंद्रजी राजकीय उखाळ्या पाखळ्या कमी करा, जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या; ‘त्या’ व्हिडिओवरून संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
- Ashish Shelar | समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातामुळं भाजप आणि महायुतीचं ‘आक्रोश आंदोलन’ रद्द
- Jitendra Awhad | हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारला खडा सवाल
- Keshav Upadhye | संजय राऊतांनी बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची – केशव उपाध्ये
- Imtiaz Jaleel | समृद्धी महामार्गावर अपघात नाही तर प्रवाशांची हत्या झाली – इम्तियाज जलील