Ajit Pawar | NCP मध्ये नेमकं चाललंय काय? काल अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणारे ‘ते’ नेते आज शरद पवारांसोबत

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शरद पवारांनासोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एक विचार करायला लावणारी घटना घडली आहे. काल अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे नेते, आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करताना दिसले आहे. Sharad Pawar is in Satara today अजित पवार (Ajit Pawar) यांनी … Read more

Published On: 

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार शरद पवारांनासोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एक विचार करायला लावणारी घटना घडली आहे. काल अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे नेते, आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करताना दिसले आहे.

Sharad Pawar is in Satara today

अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार आज साताऱ्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे, अतुल बेनके आणि मकरंद पाटील हे नेते उपस्थित होते. हे नेते काल अजित पवारांसोबत त्यांच्या शपथविधीला उपस्थित होते. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल (Ajit Pawar)  चढवला आहे. शरद पवार म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर एकत्र राहणाऱ्या समाजात भीती निर्माण केली जात आहे.”

“भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला राष्ट्रवादी पक्षाचे (Ajit Pawar) काही आपलेच लोकं बळी पडले आहे. लोकशाहीला धक्का देणाऱ्या या प्रवृत्तीला नष्ट केलं जाणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रगती आणि सामान्य जनतेच्या हिताचा विचार केला जाईल”, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही