Sharad Pawar | कराड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज कराडमध्ये आहे. या ठिकाणी त्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं आहे. सरकारकडून सामान्यांच्या लोकशाही अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
Fear is being created in a harmonious society – Sharad Pawar
कराडमध्ये बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “महाराष्ट्रासह देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकोप्यानं राहणाऱ्या समाजात भीती निर्माण केली जात आहे. लोकशाही पद्धतीनं काम करणाऱ्या राजकीय पक्षाला झटका देण्याचा प्रयत्न केला आहे.”
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “वर्ष सहा महिन्यांमध्ये पुन्हा एकदा लोकांना सामोरे जाण्याची संधी आम्हाला मिळेल. लोकशाहीला धक्का देणाऱ्या प्रवृत्तीला त्यानंतर नष्ट केलं जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात प्रगती आणि सामान्य जनतेचा हिताचा विचार केला जाईल.”
“भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला काही आपलेच लोकं बळी पडले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाणार”, असं देखील ते (Sharad Pawar) यावेळी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | अजित पवार गटाचा कोण होणार प्रतोद? ‘या’ नेत्यांनं दिली माहिती
- Jayant Patil | जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल
- Ashish Shelar | दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात
- Sanjay Raut | गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका
- Sanjay Raut | “सध्याचे मुख्यमंत्री घरी जातील अन् अजित पवार..”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य