Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी राज्याच्या राजकारणात जे घडलं होतं, काल त्याची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलं आहे. अजित पवार (Ajit Pawar) 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.
Jayant Patil filed a disqualification petition against 9 MLAs – Rahul Narvekar
जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले,”जयंत पाटील यांनी सादर केलेली याचिका मी आधी वाचून घेणार आहे. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य तो निर्णय मी देईल.”
अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी (Jayant Patil) कमकुवत झाली आहे. शरद पवारांच्या तब्बल 40 आमदारांनी त्यांची साथ सोडली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 16 आमदाराच्या अपात्रतेच्या निर्णयाची सर्वजण वाट बघत होते. अशात जयंत पाटलांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. जयंत पाटलांच्या (Jayant Patil) या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर काय निर्णय घेतली? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी; आशिष शेलारांचा संजय राऊतांवर घणाघात
- Sanjay Raut | गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरुला दगा देण्यात आला; संजय राऊतांची अजित पवारांवर खोचक टीका
- Sanjay Raut | “सध्याचे मुख्यमंत्री घरी जातील अन् अजित पवार..”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
- Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांचा पोपट झाला, राज्याला मिळणार नवा मुख्यमंत्री; ठाकरे गटाची भविष्यवाणी
- Chitra Wagh | “प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड तुम्ही…”; चित्रा वाघांचा संजय राऊतांवर घणाघात