Raj Thackeray | “उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरी…”; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

Raj Thackeray | मुंबई: अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवीन अध्याय सुरू झाला आहे. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “राज्यातील राजकारण दिवसेंदिवस किळसवाणं होत चाललं आहे. एकनिष्ठ मतदारांचा राजकीय लोकांना विसर पडला आहे. मतदारांशी या लोकांना काही घेण-देण नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय वर्तुळात काहीही सुरू आहे.”

I will not be surprised if Supriya Sule becomes Union Minister – Raj Thackeray

पुढे बोलताना ते (Raj Thackeray) म्हणाले, “काल (अजित पवार बंड) घडलेल्या घटनेशी माझा काही संबंध नाही असं शरद पवार म्हणतात. मात्र, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे असेच शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून जाणार नाही. सध्या जे घडत आहे, त्यावरून उद्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) केंद्र मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.”

दरम्यान, काल (2 जुन) अजित पवार 40 आमदारांसह शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ (Raj Thackeray) माजली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.