Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्यासह 40 आमदार शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. यामध्ये अजित पवारांसह 9 मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या घटनेनंतर अजित पवार पक्ष बांधणीला लागले आहे.
आज सकाळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार सुनील तटकरे (Sunil Tatkare) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवार लवकरच याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Anil Patil will be the representative of Ajit Pawar’s group
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाच्या प्रतोदचं नाव देखील ठरलं आहे. अनिल पाटील (Anil Pawar) हे अजित पवार गटाचे प्रतोद असणार आहेत. स्वतः अनिल पवारांनी याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 9 आमदारांच्या अपात्रेची (Ajit Pawar) याचिका दाखल केली आहे. जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुद्द्यांचा अभ्यास करून मी योग्य तो निर्णय घेईल असं, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Amol Kolhe | “… पण बापला नाही विसरायचं”; अमोल कोल्हेंची अजित पवारांवर बोचारी टीका
- Raj Thackeray | “उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरी…”; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
- Jitendra Awhad | अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरावा – जितेंद्र आव्हाड
- Ajit Pawar | NCP मध्ये नेमकं चाललंय काय? काल अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणारे ‘ते’ नेते आज शरद पवारांसोबत
- Sharad Pawar | सामान्यांचा लोकशाही अधिकार हिरवण्याचा प्रयत्न सुरू; शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल