Deepak Kesarkar | “अजित पवार सोबत आल्याने आमच्या लोकांवर अन्याय…”; दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

Deepak Kesarkar | शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. 2 जुलै रोजी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

We were sure that Ajit Pawar would come with us – Deepak Kesarkar 

या घटनेवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीपक केसरकर म्हणाले, “अजित पवार आमच्यासोबत येणार याची आम्हाला खात्री होती. जे काही आरोप प्रत्यारोप चालले होते ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात चालले होते. अजित पवार आल्याने शिंदे-फडणवीस सरकारची ताकद वाढली आहे.”

पुढे बोलताना ते (Deepak Kesarkar) म्हणाले, “अजित पवार आल्यामुळे आमच्या लोकांवर अन्याय होईल, असं काही नाही. अजून 18 मंत्री व्हायचे आहेत. त्यांचा शपथविधी देखील लवकरच होईल. अजित पवार आमच्यासोबत आल्याने शिंदे गटाला डावरलं जाणार नाही. लवकरच आमच्या लोकांचा देखील शपथविधी होणार आहे.”

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Deepak Kesarkar) सामील झाल्यानंतर अजित पवारांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आज (4 जुलै) अजित पवारांच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन देखील होणार आहे. स्वतः अजित पवार या कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.