Ajit Pawar | अजित पवार की शरद पवार? पुणे राष्ट्रवादी काँग्रेस आज घेणार निर्णय

Ajit Pawar | पुणे: अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी वेगळा गट तयार करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जागा मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. या सर्व घटनेनंतर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या गटाला पाठिंबा देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune NCP meeting will be held today

आज (4 जुलै) पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक (Ajit Pawar) होणार आहे. घोले रोड येथील नेहरू सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. पुणे राष्ट्रवादी नेमकी कोणत्या गटासोबत? याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही बैठक बोलावली आहे. पुणे राष्ट्रवादी शरद पवारांसोबत ( Sharad Pawar) जाणार की अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाणार? याचा निर्णय सर्वांशी बोलून घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे जे नेते उपस्थित होते, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे. शपथविधीला उपस्थित राहून या नेत्यांनी पक्षाची शिस्त मोडली असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर हे कृत्य पक्षाच्या ध्येय धोरणांविरुद्ध असल्याचं देखील राष्ट्रवादी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या नेत्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.