Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: काल (2 जुलै) अजित पवार यांच्यासह 40 आमदार बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर 09 मंत्र्यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते उपस्थित होते. त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
The leaders have broken party discipline by attending the swearing-in ceremony
शपथविधीला (Ajit Pawar) उपस्थित राहून नेत्यांनी पक्ष शिस्त मोडली असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर हे कृत्य पक्षाच्या ध्येय धोरणांविरुद्ध असल्याचं देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं आहे. त्यामुळे या शपथविधीला उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना राष्ट्रवादीकडून बडतर्फ करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हे आदेश दिले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत (Ajit Pawar) बंडखोरी केल्यानंतर अजित पवार यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. या संदर्भात अजित पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळी बैठक झाली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सुनील तटकरे (Sunil Tatkare) अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाचे प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) होणार असल्याचं बोललं जात आहे. स्वतः अनिल पाटीलांनी याबद्दल माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | शिंदे गटच्या ताकदीत वाढ! ‘या’ नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश
- Ajit Pawar | ‘हा’ नेता होणार अजित पवार यांच्या गटाचा प्रदेशाध्यक्ष
- Amol Kolhe | “… पण बापला नाही विसरायचं”; अमोल कोल्हेंची अजित पवारांवर बोचारी टीका
- Raj Thackeray | “उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरी…”; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
- Jitendra Awhad | अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरावा – जितेंद्र आव्हाड