Amol Kolhe | अमोल कोल्हे खासदारकी पदाचा राजीनामा देणार?

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या शपथविधीला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांनी मी शरद पवार साहेबांसोबत आहे, असं जाहीर केलं होतं. तर आज त्यांनी खासदारकी पदाचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी खासदारकी पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे म्हणाले, “शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलं आहे. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी खासदारकी पदाचा राजीनामा देणार आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन मी त्यांना माझा राजीनामा सोपवणार आहे.”

I went to meet Ajit Pawar for my work – Amol Kolhe

पुढे बोलताना ते (Amol Kolhe) म्हणाले, “मी माझ्या कामानिमित्त अजित पवारांना भेटायला गेलो होतो. तिकडे शपथविधी होणार याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. त्या ठिकाणी गेल्यावर मला याबद्दल माहिती मिळाली. राजकारणामध्ये मी लोकांचा विश्वास तोडण्यासाठी आलो नाही.”

सध्या सुरू असलेल्या राज्यकारणात मी माझी भूमिका कशी बदलू शकतो, असं देखील अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले आहे. अमोल कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार अमोल कोल्हे यांचा हा राजीनामा स्वीकारतील का? असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.