Sanjay Raut | नेत्यांनी नेत्यांच्या हिताकरिता नेत्यांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जे केलं होतं, तेच रविवारी (2 जुलै) अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार 40 आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेवर राज्यातील राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत अजित पवारांवर टीका केली आहे. ट्विट करत संजय राऊत म्हणाले, “लोकशाही : “अब्राहम लिंकन कृत व्याख्या:- नेत्यांनी नेत्यांच्या हिताकरिता नेत्यांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही!” जय हिंद!”

आज पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेप्रमाणे भाजपनं राष्ट्रवादीला फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांना पकडून राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षावर भाजपनं दावा करायला लावला आहे. पक्षाला एका विशिष्ट आकड्यात फोडायचं आणि त्या पक्षाला दावा करायला लावायचं काम भारतीय जनता पक्ष सध्या करत आहे.”

BJP is destroying the history of Sharad Pawar and Balasaheb Thackeray from Maharashtra – Sanjay Raut

“महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar), बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव आणि इतिहास नष्ट करायचं काम भाजप करत आहे. स्वतः काही करायचं नाही. परंतु, दुसऱ्याचा इतिहास नष्ट करायचा. महाराष्ट्रासह  इतर राज्यात देखील त्यांनी हे प्रयत्न केले आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.