Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देणार! सर्वोच्च न्यायालयात केली याचिका दाखल

Uddhav Thackeray | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. अशात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर उद्धव ठाकरे गटानं ॲक्शन घेतली आहे.

Uddhav Thackeray’s group has moved the Supreme Court against Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी सुनील प्रभू यांनी याचिकेतून केली आहे.

ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) आमदार सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय लवकर निर्णय देणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे गटाच्या या याचिकेनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केला होता. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांनी मिळून युतीचे सरकार स्थापन केले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.