Share

Jayant Patil | अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गट अस्वस्थ – जयंत पाटील

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. Uneasiness has arisen in the Shinde group – … Read more

Published On: 

Jayant Patil | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता पसरली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Uneasiness has arisen in the Shinde group – Jayant Patil 

जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, “आज अजित पवार गटाला मंत्रीपद वाटप होणार आहे. तत्पूर्वी शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावर आरोप करून शिंदे गट बाहेर पडला होता. आता त्यांच्यासोबतच बसायचं का? अशा चर्चा शिंदे गटात सुरू असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

“अजित पवार सत्तेत आल्याने शिंदे गटात असंतोष निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे. तर मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. 9 जणांची आम्ही पक्षातून हकलपट्टी केलेली असून बाकीचे सर्व आमदार आमचेच आहे. बाकी सर्व आमदार राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या पाठीशी तटस्थपणे उभे आहेत”, असही ते (Jayant Patil) यावेळी म्हणाले आहे.

यावेळी बोलत असताना जयंत पाटलांनी (Jayant Patil) शरद पवारांच्या (Sharad Pawar) राज्याच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली. जयंत पाटील म्हणाले, “थोड्याच दिवसात शरद पवार बीड, अहमदनगर, नाशिक, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. पाऊस असो वा नसो शरद पवार जनतेच्या भेटीला जाणार आहे. त्यापूर्वी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install