Chitra Wagh | संजय राऊतांची अवस्था पिसाळल्यासारखी झालीय – चित्रा वाघ

Chitra Wagh | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर टीका केली होती. भाजप राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड दिलं आहे. NCP leaders stopped throwing pieces in front of … Read more

Published On: 

Chitra Wagh | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप सरकारवर टीका केली होती. भाजप राजकारणातील सिरीयल किलर आणि सिरीयल रेपिस्ट असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड दिलं आहे.

NCP leaders stopped throwing pieces in front of Sanjay Raut – Chitra Wagh

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता ठाकरे गटाच्या सर्वज्ञानी संजय राऊतांसमोर तुकडे टाकायचे बंद केल्यामुळे त्यांची चांगलीच उपासमार होतेय.”

“अडीच वर्षं ज्या मालकांनी बिस्कीट खाऊ घातलं, ज्यांच्या इशाऱ्यावर राऊत शेपूट हलवत होते, त्यांनीच यांच्या गळ्यातली साखळी सोडलीय. म्हणून त्यांची अवस्था पिसाळल्यासारखी झालीय. सकाळी सकाळी भुंकणा-यांनी उच्छाद मांडला आहे…माझी बीएमसी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की, यांना जाळीच्या गाडीत टाकून त्वरीत बंदोबस्त करावा”, असही त्या (Chitra Wagh) या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजप सरकारवर (Chitra Wagh) टीकास्त्र चालवलं. ते म्हणाले, “भाजपनं शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकांना पकडून पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर भाजपनं दावा करायला लावला आहे. एखाद्या पक्षाला विशिष्ट आकड्यात फोडायचं आणि त्यांना दावा करायला लावायचं काम भाजप करत आहे.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही