Ajit Pawar | पुणे: राज्याच्या राजकारणात रविवारी (2 जुलै) मोठा भूकंप आला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यामध्ये पुणे राष्ट्रवादी कुणाला साथ देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली आहे. पुणे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) यांना साथ देणार की शरद पवारांना (Sharad Pawar) साथ देणार? याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. पुणे राष्ट्रवादी कार्यालयाचा करार माझ्या नावावर आहे. त्यामुळे या कार्यालयावर कुणी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, तर मी पोलीस तक्रार करू शकतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी म्हटलं आहे.
We will always be with Sharad Pawar – Prashant Jagtap
आम्ही कायम शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत, असं देखील प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करण्यात आला आहे. यावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण (Ajit Pawar) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, रविवारी झालेल्या शपथविधीला (Ajit Pawar)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते उपस्थित होते, त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेलं आहे. या नेत्यांनी पक्षाची शिस्त मोडली असून ते पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध गेले असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | संजय राऊतांची अवस्था पिसाळल्यासारखी झालीय – चित्रा वाघ
- Jayant Patil | अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गट अस्वस्थ – जयंत पाटील
- Sudhir Mungantiwar | राष्ट्रवादीची अवस्था ‘शोले’सारखी झाली आहे, आधे इधर आधे उधर – सुधीर मुनगंटीवार
- Ajit Pawar | शिंदे गटाला मोठा दणका! अजित पवार गटाला मिळणार ‘हे’ महत्त्वाचे खाते
- Vijay Wadettiwar | भाजपचा DNA हा ओबीसी विरोधी – विजय वडेट्टीवार