Raj Thackeray | महाराष्ट्रात किळसवाणे राजकारण; या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी केली, आता शेवटही त्यांच्यावरच होतोय- राज ठाकरे

Raj Thackeray | पुणे-  महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या प्रसंगावर मी मेळाव्यात बोलेल असे राज ठाकरे म्हाणाले. महाराष्ट्राचे राजकारण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून किळसवाणे झाले आहे.  महाराष्ट्रात अशा प्रकारांची सूरूवात शरद पवार साहेबांनीच केली आणि शेवटही त्यांच्यावरच होतोय असे राज ठाकरे म्हणाले.

राज्यात झालेल्या सत्तानाट्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. घड्याळाने काटा काढला कि काट्याने घड्याळ काढले माहित नाही असे राज ठाकरे म्हणाले.

छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत- राज ठाकरे

अजित पवारांनी केलेल्या बंडामागे शरद पवारच असल्याची शक्यता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे मंत्री पदासाठी अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत त्यामुळे हे सगळं संशयास्पद असल्याचे राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

शिंदे गटाला मोठा दणका! अजित पवार गटाला मिळणार ‘हे’ महत्त्वाचे खाते

जित पवार शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवारांसह त्यांच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या मंत्र्यांना नेमके कोणते खाते दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मंत्री पदाची यादी समोर आली आहे.

Ajit Pawar Will Be The Revenue Minister Of The State

राज्य सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाला महत्त्वाची खाती मिळणार आहे. यामध्ये

अजित पवार – महसूल मंत्री ( Ajit Pawar )

छगन भुजबळ – ओबीसी कल्याण ( Chhagan Bhujbal )

दिलीप वळसे पाटील – सांस्कृतिक आणि कृषी ( Dilip Walse Patil )

हसन मुश्रीफ – अल्पसंख्यांक आणि कामगार कल्याण ( Hasan mushrif )

आदिती तटकरे – महिला आणि बालविकास (aditi tatkare )

धनंजय मुंडे – समाज कल्याण ( dhananjay munde )

संजय बनसोड – क्रीडा आणि युवक कल्याण ( sanjay bansode )

अनिल पाटील – अन्न आणि नागरी पुरवठा ( Anil Patil )

धर्माराव आत्राम – आदिवासी विकास ( Dharmarao Baba Atram )

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गट सामील झाल्यानंतर शिंदे गटाला डावरलं जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अजित पवार गटाला महत्त्वाची खाती दिल्यानं शिंदे गटावर अन्याय झाला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

शिवाजी महाराज जसा तह करायचे, तसाच तह अजित पवारांनी केला; रूपाली पाटील ठोंबरेंचं खळबळजनक वक्तव्य

रूपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombare ) म्हणाल्या, “अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीला बंड म्हणणं चुकीचं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवार मित्र पक्ष म्हणून सामील झाले आहेत. गुवाहाटी किंवा कुठेही पळून न जाता अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार मित्र पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकण्यासाठी ज्या प्रकारे तह करायचे, तसाच अजित पवारांनी हा तह केला आहे.”

महत्वाच्या बातम्या –

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.