Share

CM EKNATH SHINDE RESIGN – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत ; राज्यात घडणार पुन्हा मोठा भूकंप 

CM EKNATH SHINDE RESIGN । राजेभाऊ मोगल,  मुंबई –  राज्यात झालेल्या सत्तानाट्यावर शिंदे गटाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. भरत गोगावले यांनी शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे सांगितले. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये थोडीफार नाराजी ही राहिलच. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धी मिळेल, जो अर्धी भाकरी खाणार होता, त्याला पाव भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे. … Read more

Published On: 

CM EKNATH SHINDE RESIGN । राजेभाऊ मोगल,  मुंबई –  राज्यात झालेल्या सत्तानाट्यावर शिंदे गटाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. भरत गोगावले यांनी शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे सांगितले. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये थोडीफार नाराजी ही राहिलच. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धी मिळेल, जो अर्धी भाकरी खाणार होता, त्याला पाव भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे. आता नाराज होऊन काय करणार? जी वस्तुस्थिती आहे, ती स्वीकारली पाहिजे. राजकारणात काहीही होऊ शकते. असे काही होईल, याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता, असे गोगावले यांनी म्हटले आहे.

शिंदे गटातील आमदारांना न सांगताच अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शिंदे गटातील आमदारांना विश्वासात न घेताच हा शपथविधी पार पडल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाच अजित पवार सत्तेत सामील होणार असल्याचे माहिती होते.

शिंदे गटातील आमदारांना विश्वासात न घेतल्यामुळे शिंदे गट मुख्यमंत्री शिंदे तसेच भाजप वर नाराज आहेत. त्यात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांना बरोबर घेण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित केला आहे. आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( EKNATH SHINDE ) यांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटातील आमदार हे मंत्रिपद मिळत नसल्याने अगोदरच नाराज होते.

शिंदेगट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वादाची ठिणगी

शिंदे सरकार बहुमतात असताना राष्ट्रवादी काँगेसला ( अजित पवार ) सोबत घ्यायची काय गरज होती? असा थेट सवाल मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या गटातील आमदार विचारत आहेत.  आपल्या गटातील आमदार यांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री शिंदे यांची तारांबळ उडाली आहे. आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. वाद वाढत असतांना मुख्यमंत्री शिंदे ( EKNATH SHINDE ) कुठलाही लवाजमा न घेता एकटेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या केबिनमध्ये गेले.

मुख्यमंत्री शिंदे आणि उदय सामंत यांच्यात सुमारे अर्धातास चर्चा झाली. शिंदे गटातील आमदार आक्रमक झाल्याने मुख्यमंत्री शिंदे चिंतेत असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होते.  शिंदे गटातील नाराजी वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

अजित पवारांना ‘अर्थ’ खातं देऊ नका- शिंदे गट

महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार ( Ajit Pawar ) अर्थमंत्री होते. त्यावेळी शिवसेनेच्या बऱ्याच आमदारांनी ते फक्त राष्ट्रवादीच्याच आमदारांनाच जास्त निधी देतात, शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देत नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या. पवार निधीबाबत दुजाभाव करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आमदारांनी केला होता. आता युती सरकारमध्ये आल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खातं देऊ नका, अशी मागणी शिंदे गटातील आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे बंड करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. सत्तेत नवे वाटेकरी आल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. ज्या अजित पवारांमुळे निधीवाटपात होणारा दुजाभाव, हे प्रमुख कारण सांगण्यात येत होते त्यांनाच आता सत्तेत बसवल्यामुळे शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही