Eknath Shinde | राजकीय वर्तुळात पुन्हा होणार मोठा भूकंप? CM शिंदे तातडीनं नागपूरहुन मुंबईला रवाना

Eknath Shinde | नागपूर: रविवारी (2 जुलै) राज्यातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जे केलं होतं तेच अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केलं आहे. अजित पवार राष्ट्रवादीत बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात आणखी एक मोठी घटना घडण्याचा अंदाज बांधला जात आहे.

Eknath Shinde came to Nagpur today to welcome President Draupadi Murmu

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या स्वागतासाठी नागपूरला आले होते. मात्र, ते तातडीने नागपूरहून मुंबईला रवाना झाले आहे. त्यांच्या परतीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, राजकीय वर्तुळात नवा भूकंप येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गट (Eknath Shinde) नाराज असल्याचं बोललं जात आहे. भरत गोगावले यांनी शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं सांगितलं आहे. “ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला आता अर्धीच मिळत होती. आता तर त्याला पावभर भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे”, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि भरत गोगवले (Bharat Gogawale) यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अचानक नागपूरहून मुंबईला परतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.