Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: 2 जुलै रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा धक्का पाचवला जात असतानाच राजकीय वर्तुळात आणखी एक भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे. काल (4 जुलै) महाराष्ट्र देशा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र देशाच्या बातमीवर शिक्का मोर्तब होणार असल्याचं दिसत आहे.
Ajit Pawar will take oath as Chief Minister on August 11
संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. 11 ऑगस्ट रोजी ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सोळा आमदार अपात्र ठरतील, त्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असं रेडीफनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे.
भाजपनं अजित पवारांना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यास सांगितलं. पावसाळी अधिवेशनानंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून नेमण्याचं आश्वासन भाजपनं अजित पवारांना दिलं आहे, असं देखील रेडीफनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
What was the need to include Ajit Pawar in the government? – Sanjay Shirsat
अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गट नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धीच मिळत होती. आता त्याला पावभरच भाकरीवर समाधान मानावं लागणार असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील या घटनेवरून नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांना सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. सर्व गोष्टींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.
Do not give finance ministry to Ajit Pawar – Shinde Group
महाविकास आघाडीमध्ये अजित पवार अर्थमंत्री होते. अजित पवार शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी देत नाही, अशा तक्रारी तेव्हा केल्या जात होत्या. त्याचबरोबर अजित पवार निधीबाबत दुजाभाव करत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील शिवसेनेच्या आमदारांनी म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा अजित पवारांकडे अर्थ खातं देणार असल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांकडं हे खातं देऊ नका, अशी मागणी शिंदे गटातील आमदार मुख्यमंत्री शिंदेंकडे करत आहे.
दरम्यान, अजित पवार राज्य सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आक्रमक झाला आहे. या सर्व गोष्टीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिंतेत भर पडली आहे. शिंदे गटात नाराजी वाढत असल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
वाचा महाराष्ट्र देशाची कालची (4 जुलै) बातमी
महत्वाच्या बातम्या
- Asim Sarode | देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील राजकारण नसावलं – असीम सरोदे
- Eknath Shinde | राजकीय वर्तुळात पुन्हा होणार मोठा भूकंप? CM शिंदे तातडीनं नागपूरहुन मुंबईला रवाना
- Nilesh Rane | “… म्हणून कोल्हा तो कोल्हाचं राहणार” निलेश राणेंची अमोल कोल्हेंवर बोचरी टीका
- CM EKNATH SHINDE RESIGN – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत ; राज्यात घडणार पुन्हा मोठा भूकंप
- Raj Thackeray | महाराष्ट्रात किळसवाणे राजकारण; या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी केली, आता शेवटही त्यांच्यावरच होतोय- राज ठाकरे