Asim Sarode | देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील राजकारण नसावलं – असीम सरोदे

Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कायदे तज्ञ असीम सरोदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

असीम सरोदे (Asim Sarode) म्हणाले, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा डॅमेज कंट्रोल थांबवण्यासाठी अजित पवारांना सत्तेत  घेण्यात आलं आहे. याआधी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम न करण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः उपमुख्यमंत्री झाले.”

Devendra Fadnavis has formed an extra-constitutional government with Eknath Shinde – Asim Sarode 

पुढे बोलताना ते (Asim Sarode) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेसोबत घटनाबाह्य सरकार स्थापन केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातलं राजकारण नसवून ठेवलं आहे. राजकारणातील अत्यंत विद्रूप चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण होत चालली आहे.”

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) व्यवस्थित काम करत नसल्यानं शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आहे, असही ते (Asim Sarode) यावेळी म्हणाले आहे.. असीम सरोदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.