Rupali Chakankar | “आम्ही त्यांची विचारधारा स्वीकारली…”; रूपाली चाकणकरांचं मोठं वक्तव्य

Rupali Chakankar | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यामध्ये अजित पवार गटाचे नेते कालपर्यंत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा विरोध करत होते. मात्र, आज हे सर्व नेते मोदींचं तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे. यावरूनच रूपाली चाकणकर यांनी मोठं विधान केलं आहे.

रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या, “हिंदुत्ववादी शिवसेना आधी आमच्यासोबत होती. आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरच आता युती केली आहे. आम्ही त्यांची विचारधारा स्वीकारलेली नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आधी आमची जी भूमिका होती तीच यापुढेही असेल.”

We do not accept Narendra Modi’s ideology – Rupali Chakankar

अजित पवार गटाचे नेते नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करत आहे. मात्र, आम्ही नरेंद्र मोदींची विचारधारा स्वीकारलं नसल्यास रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे. रूपाली चाकणकर यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, अजित पवार गटामध्ये रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडं महिला आघाडीचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं आहे. त्या सध्या महिला आयोगाच्या अध्यक्ष देखील आहेत. तर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना अजित पवार गटाचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.