Nikhil Wagle VS Sachin Tendulkar | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर महिला खेळाडूंनी शोषणाचा आरोप केला होता. त्यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी महिनाभरापासून आंदोलन सुरू होतो. साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह इतर खेळाडू या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी फरपटत खेळाडूंना जबरदस्ती आपल्या वाहनात बसवलं. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी ट्विट करत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सरकारला सवाल विचारला आहे.
Nikhil Wagle said Dear Sachin Tendulkar, I am ashamed that you are Bharat Ratna
भारतीय महिला खेळाडूंवर झालेल्या अत्याचाराबाबत निखिल वागळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक खेळाडू असून सचिन तेंडुलकरने कुस्तीवीर मुलींच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून निखिल वागळे यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला आहे. लाज वाटते तू भारतरत्न असल्याची, असा घणाघात निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी सचिन तेंडुलकरवर केला आहे. त्याचबरोबर निखिल वागळे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
Nikhil Wagle VS Sachin Tendulkar Tweet
प्रिय सचिन, कुस्तीगीर मुलींची वेदना तुला अजूनही समजली नसेल तर तुझ्यातला माणूस मेला आहे! लाज वाटते तू भारतरत्न असल्याची..
प्रिय सचिन, कुस्तीगीर मुलींची वेदना तुला अजूनही समजली नसेल तर तुझ्यातला माणूस मेला आहे! लाज वाटते तू भारतरत्न असल्याची..#WrestlerProtests
— nikhil wagle (@waglenikhil) May 30, 2023
आज संध्याकाळी ६ वाजता कुस्तीगीर मुली सरकारच्या निषेधार्थ आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. काय म्हणावं या कोडग्या सरकारला?
आज संध्याकाळी ६ वाजता कुस्तीगीर मुली सरकारच्या निषेधार्थ आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. काय म्हणावं या कोडग्या सरकारला?#WrestlerProtests
— nikhil wagle (@waglenikhil) May 30, 2023
नीरज चोप्रा,अभिनव बिंद्रासारखे महिला कुस्तीगिरांच्या बाजूने उभे राहिलेले एखाददोन अपवाद सोडता बहुसंख्य सेलेब्रिटी खेळाडू इतके थंड रक्ताचे कसे? विनयभंगासारख्या आरोपांचं गांभीर्य त्यांना कळत नाही? आपल्या स्वतःच्या बहिणीवर अत्याचार झाला तरी असे डरपोकपणे वागाल काय? #WrestlerProtests
— nikhil wagle (@waglenikhil) May 30, 2023
महत्वाच्या बातम्या
- Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
- Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे
- UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात
- Vinayak Raut | फक्त भुंकण्यासाठी भाजपने नितेश राणेंना कुत्रा म्हणून पाळलं – विनायक राऊत
- Ruturaj Gaikwad | IPL जिंकताचं ऋतुराजचा मोठा खुलासा! पहिल्यांदा फोटो शेअर करत म्हणाला…