Gautami Patil | महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण ! – संभाजीराजे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gautami Patil vs Sambhaji Raje | टीम महाराष्ट्र देशा: सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या आडनावावरून चांगलाच वाद पेटला आहे. गौतमीने पाटील आडनाव लावू नये, अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. या मुद्द्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य करत कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हटलं होतं. काल संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी गौतमीला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.

Sambhaji Raje support to Gautami Patil yesterday but not today

कलाकारांना संरक्षण मिळाले पाहिजे या मताचा मी आहे, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी दिली होती. छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विट करत संभाजीराजेंनी गौतमीला (Gautami Patil) दिलेला पाठिंबा माघारी घेतला आहे.

Chhatrapati Sambhajiraje tweet

काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली. मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती. पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे.

मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली. आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण !

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “महिलांनी आपले कर्तृत्व आणि गुण दाखवायला पाहिजे. सर्वांनी त्यासाठी महिलांच्या पाठीशी उभे राहिला हवे. मराठा समाज नव्हे, तर अनेक समाजातील लोक पाटील आडनाव वापरतात. कारण पाटील हे आडनाव नसून किताब आहे. कलाकारांना (Gautami Patil) सुरक्षा मिळायला हवी.”

महत्वाच्या बातम्या