Gautami Patil | बीड: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. गौतमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. त्याचबरोबर कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी बघायला मिळते. अशात गौतमीला बीडच्या एका तरुणाने लग्नासाठी मागणी घातली आहे. बीडच्या 26 वर्षीय रोहन गलांडे पाटील याने गौतमीला पत्राद्वारे लग्नासाठी मागणी घातली आहे.
A 26-year-old youth from Beed proposed to Gautami Patil
रोहन गलांडे पाटील याने गौतमीला (Gautami Patil) पत्र पाठवत लग्नासाठी मागणी घातली आहे, त्याने पत्रात म्हटलंय, “गौतमी पाटील तू माझी परी होणार का? मी रोहन गलांडे पाटील तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे. तू जशी आहे तशीच मी तुला स्वीकारायला तयार आहे. माझे वय 26 वर्षे आहे. त्याचबरोबर मी एक शेतकरी पुत्र आहे. तू जर माझ्यासोबत लग्नाला तयार असशील तर मला भेटायला ये. मी तुझ्यासोबत लग्नासाठी तयार आहे.”
रोहन गलांडे पाटील या तरुणाने पत्रासह आपल्या घराचा पत्ता देखील गौतमीला दिला आहे. वराच्या शोधात असणारी गौतमी पाटील (Gautami Patil) बीडच्या रोहन गलांडे पाटलाच्या पत्राला काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
What did Gautami say?
“मी (Gautami Patil) 25 वर्षाची आहे. लग्न करून घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. मला फक्त माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मानसन्मान, पैसा, प्रसिद्धी मला नको. मुलाने फक्त मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी मुलींच्या शाळेत शिकली आहे. त्याचबरोबर मला भाऊ नाही. माझा पुरुष मंडळीशी कधी संबंध आलाच नाही. माझ्या संसाराचा भार एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Gargi Phule | निळू फुले यांच्या मुलीचं राजकारणात पदार्पण! केला ‘या’ पक्षात प्रवेश
- Gautami Patil | संभाजीराजेंचा काल गौतमीला पाठिंबा तर आज माघार; म्हणाले…
- Chennai Super Kings | CSK च्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनं घेतला IPL मधून निवृत्त होण्याचा निर्णय
- MS Dhoni | चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा धोनीचं राज्य! लास्ट मॅच खेळणाऱ्या रायुडूला सोपवली ट्रॉफी, पाहा VIDEO
- Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …