Chennai Super Kings | CSK च्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनं घेतला IPL मधून निवृत्त होण्याचा निर्णय

Chennai Super Kings | टीम महाराष्ट्र देशा: काल इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) चा अंतिम सामना पार पडला. या अंतिम सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नईने आयपीएलचा अंतिम सामना खेळला. आयपीएल 2023 नंतर चेन्नईच्या अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

Chennai Super Kings’ Ambati Rayudu has decided to retire from IPL

38 वर्षीय अंबाती रायुडू (Ambati Rayudu) ने आयपीएलमधून (Chennai Super Kings) निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी 55 वनडे आणि 6 टी-20 सामने खेळले आहे. त्याचबरोबर त्याने आयपीएल फायनलआधी 203 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने तब्बल 4329 धावा केल्या आहेत. रायुडूने ट्विट करत आपल्या निवृत्ती बद्दल जाहीर केलं आहे.

ट्विट करत रायुडू म्हणाला, “आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई (Chennai Super Kings) हे दोन्ही सर्वोत्कृष्ट संघ आहे. 204 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी आणि आज सहावी ट्रॉफी जिंकू, अशी मला आशा आहे. आयपीएल 2023 ची फायनल माझा आयपीएलचा शेवटचा सामना असेल. या टूर्नामेंटमध्ये मी खेळण्याचा आनंद लुटला आहे. सर्वांचे खूप आभार.”

दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये चेन्नईने (Chennai Super Kings) पाच गडी राखून विजय मिळवला. पाचव्यांदा जेतेपद मिळवून संपूर्ण संघ अत्यंत आनंदी होता. त्याचवेळी सामना संपल्यानंतर रॉजर बिन्नी आणि जय शहा यांनी कर्णधार धोनीला ट्रॉफी घेण्यासाठी बोलावलं. धोनीने (MS Dhoni) ट्रॉफी घेऊन ती लगेच अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्याने संघातील युवा खेळाडू मथिश पथिरानाला ट्रॉफी दिली. त्यानंतर चेन्नईने आपला विजय साजरा केला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.