Naseeruddin Shah | मुंबई: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत असतात. अशात त्यांनी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना त्यांनी देशातील सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. देशामध्ये मुस्लिमांचा द्वेष करणं ही सध्या फॅशन झाली आहे, अशी खोचक टीका नसरुद्दीन शाह यांनी सरकारवर केली आहे.
It has become fashionable to hate Muslims in the country – Naseeruddin Shah
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) म्हणाले, “सध्या चित्रपटांमध्ये जे दाखवलं जातं, ते समाजात घडत आहे. ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या दाखवल्या गेल्या आहे. मात्र, त्या सर्व मुस्लिमविरोधी आहे. देशामध्ये सध्या एका धर्मावर लक्ष साधून त्याच्या विरोधात द्वेष निर्माण केला जात आहे.”
“देशामध्ये सुशिक्षित लोकांमध्ये देखील मुस्लिमांचा द्वेष करणे फॅशन झाली आहे. सत्ताधारी पक्षांनं अत्यंत हुशारीने लोकांच्या मनात मुस्लिमांबद्दल द्वेष निर्माण केला आहे. आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष असल्याचं आपण सांगतो. पण मग प्रत्येक गोष्टीमध्ये आपण धर्म का आणतो?”, असा सवाल देखील त्यांनी (Naseeruddin Shah) यावेळी उपस्थित केला आहे.
“सध्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती लवकरच बदलेल अशी मी आशा करतो. सध्या देशामध्ये नकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्याचं सरकार त्याला खतपाणी घालत आहे. अत्यंत हुशारीने सरकार हे डावपेच खेळत आहे,” अशा शब्दात नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Dress Code In Temple | पुण्यानंतर राज्यातील ‘या’ ठिकाणच्या मंदिरात ड्रेस कोड लागू
- Amol Kolhe | कलाकाराच्या नाव आडनावापेक्षा त्याची कला महत्त्वाची; गौतमी पाटील आडनाव वादावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- Weather Update | आज राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- NCP | लज्जास्पद! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रस्त्यात महिलेला शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी करून महिलेचा लैंगिक छळ
- Pre Wedding Photoshoot | महाराष्ट्रात प्री वेडिंग शूटवर बंदी; मराठा संघटनेचा धाडसी निर्णय