Weather Update | आज राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे नागरिक उन्हाने (Heat) हैराण होत असताना, राज्यात दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा तडाका सहन करावा लागणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर उर्वरित राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Chance of rain in ‘these’ parts of the state today

राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांमध्ये पुढील 24 तास पावसाचा जोर पाहायला मिळणार असल्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यामध्ये रत्नागिरी, नाशिक, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसात अंदमान निकोबार बेट आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण (Weather Update) तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साधारतः नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख 01 जून असते. मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल होणार आहे. केरळमध्ये 04 जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या