Share

मोठी बातमी! महाराष्ट्रात पुढचे ४ दिवस तुफान पाऊस; तुमच्या जिल्ह्यात ऑरेंज-येलो अलर्ट? लगेच तपासा!

Maharashtra monsoon intensifies in July. IMD issues rain alerts for next four days.

Published On: 

Maharashtra Rain: Rain will take a break in the state; Agriculture Department's important advice to farmers | IMD alerts

मुंबई: मान्सूनने देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता महाराष्ट्रातही जोरदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यभरात पावसाची दमदार सुरूवात झाली असून, हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी महत्त्वाचे अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोर पकडला आहे.

आज मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला. तसेच, विदर्भात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमसह इतर जिल्ह्यांतही जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.

Maharashtra IMD Rain Alerts

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. यामध्ये कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

आज (१ जुलै): संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रायगड, ठाण्यात पावसाचा येलो अलर्ट आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर (अहमदनगर), बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्या (२ जुलै): सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

३ जुलै: रायगड, रत्नागिरी तसेच सातारा आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नाशिक घाट परिसर, तसेच संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

४ जुलै: चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित विदर्भात येलो अलर्ट राहील. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेडसह तळकोकण आणि पुणे, सातारा व कोल्हापूर घाट परिसरातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही