Pre Wedding Photoshoot | महाराष्ट्रात प्री वेडिंग शूटवर बंदी; मराठा संघटनेचा धाडसी निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pre Wedding Photoshoot | सोलापूर : लग्न म्हटलं की, वर- वधू लग्नाच्या आधी वेडिंग शूट करून घेतात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यतील लग्न ही एक महत्वाची गोष्ट आहे. परंतु, सध्या याच प्री वेडिंग शूटचं (Pre-Wedding Photoshoot) प्रमाण वाढलं आहे. तसचं सध्या काही समाजातून या प्री वेडिंग शूटवर (Pre – Wedding Photoshoot) बंदी घालण्यात येत आहे. तर आता प्री वेडिंग शूटवर मराठा सेवा संघाच्या वतीने देखील बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा संघटनेनं घातली प्री वेडिंग शूटवर बंदी-

तसचं हा निर्णय घेण्यापूर्वी मराठा वधू-वरांचा सोलापूर या ठिकाणी मेळावा पार पडला आहे. त्या मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या मताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसचं जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड यांच्यावतीनं याबाबतचे निवेदनही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आहे. अशी माहिती मराठा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील ( Prashant Patil) यांनी दिली आहे.

maratha Community Banned Pre – Wedding Photoshoot

दरम्यान, प्रशांत पाटील (Prashant Patil) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, अनेक लोकांची परिस्थिती नसतानाही लाखो रूपये खर्च या प्री वेडिंग शूटवर (Pre – Wedding Photoshoot) खर्च केले जातात. याचप्रमाणे वैयक्तिक फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा झालीय. ज्या रूढी परंपरा आहेत त्या मागे पडत चालल्या आहेत. तसचं मराठा सेवा संघाने अनेक दिवसांपासून ‘एक गाव एक विवाह’ ही संकल्पना सुरू केली होती आणि भविष्यात ही संकल्पना नक्कीच पुढे आणली जाईल. अस देखील प्रशांत पाटील म्हणाले.

Photographers Association Solapur-

तर सोलापूर बहुउद्देशीय फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता शिंदे ( Datta Shinde) यांनी आवाहन केलं आहे की, जो काही सामाजिक वर सूचक मंडळांनी निर्णय घेतला आहे त्याचा पुन्हा विचार करावा. कारण कोरोनानंतर आमच्या व्यवसायाला सुरवात झाली आहे. आमच्या रोजी- रोटीचा प्रश्न आहे. याचप्रमाणे हा प्रत्येकाचा हौसेचा विषय आहे.